भारत-पाक युद्धाचा भडका

yongistan
By - YNG ONLINE

रात्रभर क्षेपणास्त्र हल्ले, भारताचे जोरदार प्रत्युत्तर
नवी दिल्ली : भारतीय सैन्याने गुरुवार (दि. ८) रात्रभर पाकिस्तानला मोठा दणका दिला. भारताने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार उडाला. कानठळ््या बसवणाºया स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेले. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली...पाकिस्तानातील १६ शहरांवर भारताने जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला...अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली. दरम्यान, शुक्रवारी सकाळीही पाकिस्तानने चंदीगडमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यानंतर भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानावर ड्रोन हल्ला केला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारी रात्रीपासून युद्धाला तोंड फुटले आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तान आणि भारताने एकमेकांवर हवाई हल्ले केले होते. यामध्ये भारताने पाकिस्तानचे हवाई हल्ले परतावून लावले होते. परंतु भारतीय वायूदलाच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहोर, क्वेटा या प्रमुख शहरांमध्ये मोठे नुकसान झाले होते. भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेनेही कराची बंदरावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यानंतर दुसºया दिवशीही शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरु असल्याचे दिसत आहे.  

भारतीय वायदूलाने शुक्रवारी सकाळीही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या ओकारा आर्मी कैंट परिसरात ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. कालच भारताने पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तान सातत्याने सीमारेषेवर हल्ले करत आहे. शुक्रवारी सकाळीच पाकिस्तानचे ५ ड्रोन्स चंदीगढ शहरात शिरले होते. त्यामुळे सायरन वाजवून शहरातील सर्व लोकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर आता भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. 

पाकचे ५० ड्रोन्स पाडले
पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या सीमारेषेवर असलेल्या १५ शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. नियंत्रण रेषेलगत विविध ठिकाणी भारताच्या लष्करी तळांवर आणि शहरांवर स्वार्म ड्रोन्सने हल्ले केले. भारताने पाकिस्तानचे जवळपास ५० ड्रोन्स पाडले. पाकिस्ताने भारताच्या उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा,  राजौरी आणि पठाणकोट या भागात क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला होता. तसेच पाकिस्तानची अनेक ड्रोन्सही भारतावर हल्ला चढवण्यासाठी आली होते. मात्र, भारताच्या एस-४०० या डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने पाडली. याशिवाय, एल ७० गन, झेडयू-२३ एमएम आणि शिल्का यंत्रणेनेही पाकिस्तानचे रॉकेट हल्ले परतावून लावले. 

 ताजमहाल, लाल किल्ला, 
इंडिया गेट सुरक्षा वाढवली 
भारत पाकिस्तान यांच्यामधील युद्धजन्य पार्श्वभूमीवर भारताने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ताजमहाल, लाल किल्ला, इंडिया गेटवर सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दिल्ली पोलिसांच्या गाड्यांची गस्त, असामाजिक तत्व, अनोळखी वस्तू दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. भारताची आर्थिक राजधानीसह महाराष्ट्रातही अलर्ट जारी केला असून, सार्वजनिक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.