देशात प्रथमच बिहारमध्ये मोबाईल ॳॅपवर मतदान

yongistan
By - YNG ONLINE
६ नगरपालिकांमध्ये ई-व्होटिंगचा प्रयोग
पाटणा : वृत्तसंस्था 
देशात पहिल्यांदाच शनिवार, दि. २८ जून २०२५ रोजी मोबाइल ऍपद्वारे मतदान पार पडले. बिहारमधील २६ जिल्ह्यांमधील ४२ नगरपालिकांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. पायलट प्रोजेक्ट म्हणून ६ नगरपालिकांमध्ये ई-व्होटिंगचा प्रयोग करण्यात आला. मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणा-यांना मतदानाची सोय व्हावी, यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला. मतदानासाठी दोन ऍप्स लाँच करण्यात आले आहेत.
मोबाईल अ‍ॅपद्वारे मतदान करण्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागत होती. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार ५० हजारांहून अधिक लोकांनी ई-मतदानासाठी नोंदणी केली होती. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत ई-मतदान झाले. दुबई, कतारसारख्या देशांमध्ये राहणा-या स्थलांतरित बिहारींनीही ऍपद्वारे मतदान केले.
मोतीहारी येथील विभा यांनी ऍपद्वारे पहिले मतदान केले आणि ती देशातील पहिली ई-मतदार बनली. दुपारी १ वाजेपर्यंत ८०% पेक्षा जास्त ई-व्होटिंग झाले तर ३५% लोकांनी बूथवर जाऊन मतदान केले. बिहारमधील ६ नगरपालिका संस्थांच्या १३६ जागांसाठी आज मतदान पार पडले. ३ नगरपालिका संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर मतदान होत आहे तर उर्वरित ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत.