पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

yongistan
By - YNG ONLINE

ब्रासिलिया : वृत्तसंस्था 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी ५ देशांच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझील दौऱ्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर या दौऱ्याची माहिती दिली आणि खास फोटो शेअर केले. त्यांना बुधवार, दि. ९ जुलै २०२५ रोजी ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी ब्राझील आणि भारतातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला.


पीएम मोदी यांनी ब्राझील दौऱ्यानंतर सोशल मीडिया एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात भारत आणि ब्राझील यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होण्याचा आशय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये पहिल्या ब्रिक्स संमेलनात सहभागी झाले. मग ते सोमवारी ब्रासिलिया येथे पोहचले. ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोस मुसियो मोंटेइरो फिल्होने त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रासिलिया येथील विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी पारंपारिक ब्राझिलियाई सांबा रेगे नृत्य सादर केले. यावेळी शिव स्त्रोत्र, गणेश वंदना आणि इतर भारतीय परंपरांचे दर्शन येथे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ६-७ जुलै रोजी रियो डी जेनेरियो येथील ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी झाल्यानंतर ब्रासिलिया येथे पोहचले.

या यात्रेदरम्यान ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला डी सिल्वा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि जागतिक मंचावर दोन्ही देशांमध्ये सहयोग वाढवल्याबद्दल देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने मोदींना सन्मानित करण्यात आले.
नामिबियाचा मोदींना सर्वोच्च पुरस्कार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शिएंट वेल्वित्शिया मिराबिलिस’ने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार १९९५ पासून सुरु झाला आहे. विशिष्ट सेवा आणि नेतृत्व गुणांचा आदर करण्यासाठी नामिबिया राष्ट्रामार्फत हा पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्काराचे नाव वेल्वित्शिया मिराबिलिस असे ठेवण्यात आले आहे. अत्यंत दुर्लभ आणि प्राचीन वाळवंटी झुडुपावरून हे नाव दिले. हे दुर्मिळ झाड केवळ नामिबियातच आढळते.