महाराष्ट्राचा भूगोल (थोडक्यात पण महत्त्वाची माहिती)

yongistan
By - YNG ONLINE

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात २६ जिल्हे, २३५ तालुके, ४ प्रशासकीय विभाग होते. सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे, ३५५ तालुके, ५३५ शहरे, ४३६६३ खेडी, ६ प्रशासकीय विभाग आहेत.

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागा


तले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१३ चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. 

महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा संत मुक्ताई यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास संतांची भूमी असेदेखील म्हणले जाते. पंढरपूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मुंबई भारतातील टॉप शहर असून येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेट खेळाडू तयार होतात.  मुघल साम्राज्याविरुद्ध लढा, देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत. जिजाऊ माताचे जन्म स्थान सिंदखेड राजा आणित्यांचे सासा जेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाले ते शिवनेरी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र रीज्याला खुप मोठा इतिहास आहे.

उपलब्ध ऐतिहासिक साधनातून इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडांत व्यापले होते.

१५ ऑगस्ट  १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. अखेर १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले. परंतु बेळगाव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगावासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.


६ प्रशासकीय विभाग

१) कोकण (३०७४६ चौ. किमी) : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.

२) पुणे/प.महाराष्ट्र (५७२६८ चौ. किमी) : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

३) नाशिक/खान्देश (५७४४२६ चौ. किमी) : नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.

४) औरंगाबाद/मराठवाडा (६४८२२ चौ. किमी) : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड.

५) अमरावती/प. विदर्भ (४६०९० चौ. किमी) : अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.

६) नागपूर/पूर्व. विदर्भ (५१३३६ चौ. किमी) : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

नैसर्गिक सीमा 

१) वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.

२) उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या.

३) ईशान्येस : दरेकासा टेकड्या.

४) पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.

५) दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.

६) पश्चिमेस : अरबी समुद्र.

राजकीय सीमा व सरहद्द 

१) वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.

२) उत्तरेस : मध्य प्रदेश.

३) पूर्वेस : छत्तीसगड.

४) आग्नेयेस : आंध्र प्रदेश.

५) दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.


राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :

१) गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे

२) दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक

३) मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

४) छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली

५) आंध्र प्रदेश : गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड

६) गोवा : सिंधुदुर्ग


महाराष्ट्राचे भारतातील स्थान 

१) भारतातील २९ राज्यांपैकी एक

२) भारताच्या मध्यवर्ती भागात 

३) महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .

-व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.

-पाया कोकणात व निमुळते टोक विदर्भात.


लांबी, रुंदी व क्षेत्रफळ

१) लांबी : पूर्व-पश्चिम : 800 किमी.

२) रुंदी : दक्षिण-उत्तर : ७२० किमी.

३) क्षेत्रफळ : ३०७७१३ चौ.किमी.

४) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थान, मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रचा ३ रा क्रमांक लागतो.

५) महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.

६) समुद्रकिनारा ७२० किमी. लांबीचा आहे.


जिल्हे निर्मिती 

१) १ मे १९८१ : रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग (२७ वा जिल्हा)

२) औरंगाबादपासून : जालना (२८ वा जिल्हा)

३) १६ ऑगस्ट १९८२ : उस्मानाबादपासून (धाराशिव) लातूर (२९ वा जिल्हा)

४) २६ ऑगस्ट १९८२ : चंद्रपूरपासून  गडचिरोली (३० वा जिल्हा)

५) १९९० : मुंबईपासून मुंबई उपनगर (३१ वा जिल्हा)

६) १ जुलै १९९८ : धुळेपासून  नंदुरबार (३२ वा जिल्हा)

७) अकोल्यापासून वाशिम (३३ वा जिल्हा)

८) १ मे १९९९ : परभणीपासून हिंगोली (३४ वा जिल्हा)

९) भंडारापासून गोंदिया (३५ वा जिल्हा)

१०) १ ऑगस्ट २०१४ : ठाण्यापासून पालघर (३६ वा जिल्हा)