पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेली ५० वर्षे गजानन मेहेंदळे यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये खूप मोठे ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. फारसी, मोडी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते.
ज्येष्ठ मराठी इतिहास संशोधक व इतिहासाभ्यासक; विशेषत: शिवचरित्र आणि मुघलकालीन दस्तऐवज/इतिहास या क्षेत्रातील संशोधनासाठी ओळखले जातात. ते पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाशी संबंधित संशोधक होते. मराठी, तसेच फारसी/उर्दू व इतर भाषिक दस्तऐवजांचा अभ्यास. त्यांनी शास्त्रीय स्रोत आणि नकाशे, संदर्भसहित इतिहासगोष्टी मांडल्या आहेत.