मुंबई : राज्यात त्रिभाषा धोरणावरून वाद निर्माण झाला होता. तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीला कडाडून विरोध करण्यात आला. राज्यात विरोधाची धार वाढल्याचे पाहून राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर मागे घेतले आणि या सूत्रावर पुनर्विचार करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली.
आता या समितीतील सदस्यांची शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी नेमणूक करण्यात आली असून, यामध्ये डॉ. सदानंद मोरे (माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती), डॉ. वामन केंद्रे, (संचालक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा), डॉ. अपर्णा मॉरिस, (शिक्षणतज्ज्ञ, पुणे), श्रीमती सोनाली कुलकर्णी जोशी, (भाषा विज्ञान प्रमुख, डेक्कन कॉलेज, पुणे), डॉ. मधुश्री सावजी (शिक्षणतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर), डॉ. भूषण शुक्ल (बालमानसतज्ज्ञ, पुणे), संजय यादव (राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई) (सदस्य सचिव) यांचा समावेश आहे.