‘सीसीएमपी’ कोर्स केलेल्या डॉक्टरांची ‘एमएमसी’त नोंद

yongistan
By - YNG ONLINE



-राज्यातील १ लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत राज्य सरकारने सीसीएमपी (सर्टिर्फिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी) कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (एमएमसी) स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे आदेश आज जारी केले. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे १ लाख होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना मर्यादित स्वरूपात आधुनिक औषधोपचार करण्याचा अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

 राज्य शासनाने २०१४ साली होमिओपॅथी डॉक्टरांसाठी आधुनिक औषधशास्त्रावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजेच सीसीएमपी कोर्स सुरू केला होता. या मागचा उद्देश म्हणजे ग्रामीण व दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम करणे आहे. या कोर्ससंदर्भात सरकारने ३० जून २०२५ रोजी आदेश काढून, कोर्स पूर्ण करणा-या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे करण्याचे निर्देश दिले होते.

आयएमएने दाखल 

केली होती याचिका 

सरकारच्या या निर्णयाला विरोध करत, इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा नाकारत, राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला.