हॉकीत भारताने जिंकला आशिया कप

yongistan
By - YNG ONLINE

गतविजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताने दक्षिण कोरियाला ४-१ ने पराभूत करत हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी हॉकी आशिया कप जिंकला. भारतासाठी सुखजीत सिंह, अमित रोहिदासने प्रत्येकी एक गोल केला तर दिलप्रीत सिंह याने दोन गोल केले. भारताने या वि


जयासह २०१३ च्या आशिया कपच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. त्यावेळी दक्षिण कोरियाने भारताला ४-३ असे पराभूत केले होते. भारताने आतापर्यंत ४ वेळा आशिया कप जिंकला आहे. या आधी २०१७ मध्ये चषक जिंकला होता. ८ वर्षांनंतर भारताने पुन्हा आशिया चषकवर शिक्कामोर्तब केले. 

भारताने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्या मिनिटातच गोल केला. भारताच्या सुखजीत सिंगकडे एक चांगला पास आला, त्याला गोल करण्याची संधी मिळाली आणि या संधीचे सोने करीत भारताला फक्त ३० व्या सेकंदालाच पहिला गोल करून दिला. पण त्यानंतर दिलप्रीत सिंगने सामन्याच्या २८ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर दिलप्रीतने पुन्हा एकदा ४८ व्या मिनिटाला गोल केला आणि २ मिनिटांतच अमित रोहितदासने अजून एक गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

भारताला ८ वर्षांनी आशिया कप जिंकता आला. यापूर्वी २०१७ साली भारताने आशिया कप जिंकला होता. आज आशिया कप जिंकत आशियामधील अव्वल संघाचा बहुमान मिळविला. या विजयाने आता वर्ल्ड कपसाठी भारताचे तिकीट निश्चित झाले आहे. २०२६ मध्ये नेदरलँड, बेल्जियममध्ये या वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. भारताने आशिया कपच्या अंतिम सामन्यात ४ गोल केले तर कोरियाला फक्त एकाच गोलवर समाधान मानावे लागले. नवव्यांदा अंतिम फेरीत दाखल झालेल्या भारताने चौथ्यांदा आशिया चषक जिंकला. भारताने या अगोदर २०१७ मध्ये जिंकला होता. सर्वांत जास्त आशिया कप (५) दक्षिण कोरियाने जिंकले आहेत. या दोन देशांत ३ वेळा अंतिम लढत झाली. यात २ वेळा दक्षिण कोरियाने तर १ वेळा भारताने विजय प्राप्त केला.

चारवेळा जिंकला आशिया चषक

भारताने पहिल्यादा २००३ मध्ये आशिया चषक पटकावला होता. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला ४-२ ने पराभूत केले होते. त्यानंतर २००७ मध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केला. या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ७-२ ने धुव्वा उडवला. त्यानंतर २०१७ मध्ये मलेशियाला २-१ ने पराभूत केले होते. आता २०२५ मधील स्पर्धेत दक्षिण कोरियाला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरले.