राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार

yongistan
By - YNG ONLINE



भाड्याचे दर निश्चित, लवकरच सेवेत

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात लवकरच ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार असून राज्य परिवहन विभागाने ई-बाईक टॅक्सीच्या भाड्याचे दर निश्चित केले आहेत. पहिल्या दीड किलोमीटरसाठी १५ रुपये आणि त्यानंतरच्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १० रुपये २७ पैसे इतकेभाडे आकारण्यात येणार आहे. रॅपिडो, ओला, उबर यांसह आणखी एका संस्थेला ई-बाईक टॅक्सीसाठी परवाना देण्यात आला आहे. 

याआधी अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यात येत होती. पण महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आल्यानंतर आता भाड्याचे दरही निश्चित झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने ई-बाईक टॅक्सी सेवा सुरु करण्याचे धोरण मंजूर केले आहे. त्याला महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५’ या नावाने मसुदा धोरण जारी करण्यात आले आहे.