नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेने नाटोच्या देशांनी रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असा सल्ला दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन नाटोमधील सदस्य देश रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. यूक्रेनने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. भारतातून आयात केल्या जाणा-या डिझेलची खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला. यूक्रेनची एक एनर्जी कन्सलटन्सी एनकोरने सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी याबाबत घोषणा केली. १ ऑक्टोबर २०२५ पासून भारताकडून खरेदी केल्या जाणा-या डिझेलवर बंदी घालण्याचा निर्णय यूक्रेनने घेतला.
एनकॉरने म्हटले की, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. यामुळे यूक्रेनला हे पाऊल उचलावे लागले. एनकोरने म्हटले की, रशियाकडून ड्रोन आणि मिसाईलद्वारे यूक्रेनच्या तेल रिफायन-यांवर हल्ले करत आहे. कंपनीच्या मते यूक्रेनच्या सूरक्षा एजन्सीजने त्यांना आदेश दिला की भारताकडून आयात केल्या जाणा-या डिझेलची चौकशी करावी. ज्याद्वारे रशियन कंपोनंटबाबत माहिती घेता येईल.
भारताकडून यूक्रेन किती
डिझेल खरेदी करते?
एनकोरनं म्हटले की, यूक्रेनने ऑगस्ट २०२५ मध्ये भारताकडून ११९००० टन डिझेल खरेदी केले होते. जे त्यांच्या एकूण डिझेल आयातीच्या १८ टक्के अधिक होते. २०२२ मध्ये रशिया-यूक्रेन युद्ध सुरु झाले होते. त्यापूर्वी यूक्रेन-बेलारुसही रशियाकडून डिझेल खरेदी करत होता. अ-९५ कन्सलटन्सीने म्हटले की या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत डिझेलची आयात गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ टक्क्यांनी घटून २.७४ मिलियन मेट्रिक टन आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. कारण आखाती देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. रशियाकडून मिळणा-या आणि आखाती देशांच्या कच्चा तेलाच्या दरात फरक आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला.