महात्मा फुले

yongistan
By - YNG ONLINE

जन्म : ११ एप्रिल १८२७

मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०

१८६९ : स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

१८५२ : पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

२१ मे १८८८ : वयाची ६० वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी. युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.


महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय

आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराणे मूळचे सातार्‍यापासून २५ मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण

फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांनी इ. स. १८३४ मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाणे काही उच्चवर्णीयांना आवडले नाही. कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे, असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी १८३४ ते १८३८ हे चार वर्ष कसे तरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. इ. स. १८४१ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या ईंग्रजी शाळेत घातले. महात्मा फुले १३ वर्षाचे असताना इ. स. १८४० मध्ये त्यांचा विवाह नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय ८ वर्षाचे होते. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला होता.

संस्थात्मक योगदान

३ ऑगस्ट १८४८ : पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा.

४ मार्च १८५१ : पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

१८५२ : अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

१८५५ : प्रौढांसाठी रात्र शाळा

१८६३ : बालहत्या प्रतिबंधक गृह

१८७७ : दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.

१० सप्टेंबर १८५३ : महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

२४ सप्टेंबर १८७३ : सत्यशोधक समाजाची स्थापना

व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.

१८८० : म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.


महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन 

१८५५ : तृतीय रत्न नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

१८६८ : ब्राम्हणांचे कसब

१८७३ : गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.

१८७३ : अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.

१ जानेवारी १८७७ : दीनबंधू मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केले.

१८८० पासून लोखंडे दिन बंधूंचे व्यवस्थापन सांभाळले.

१८८३ : शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

१८८५ : इशारा सत्सार, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीरनामा म्हणतात.

अस्पृश्यांची कैफियत.

शिवाजी महाराजांचा पोवाडा. 



महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये

थॉमस पेनच्या पुस्तकाचा प्रभाव.

१८६४ :  पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

१८६८ : अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

१८७९ : रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.

२ मार्च १८८२ : हंटर कमिशन पुढे साक्ष.

ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

सत्यशोधक समाजाचे ब्रीद : सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी

सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.