ट्रम्प यांची आता विदेशी सिनेमांवर वक्रदृष्टी

yongistan
By - YNG ONLINE



विदेशी औषधांनंतर आता विदेशी सिनेमांवर १०० टक्क टॅरिफ 

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर तयार झालेल्या सिनेमांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवल्या जाणा-या औषधांच्या आयातीवर १०० टक्के टॅरिफ लादले आहे. अमेरिकेला पुन्हा महान बनवायचे, असेदेखील ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी एकानंतर एक निर्णय घेऊन भारतासह जगभरातील अनेक देशांना धक्का देत आहेत. यावरून जागतिक स्तरावरून ट्रम्प यांच्या विरोधात रोष वाढत आहे. अमेरिकन नागरिकांनाही महागाईचा सामना करावा लागत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुस-या टर्ममध्ये अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार त्यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. आता ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनलेल्या सिनेमांवर १०० टक्के टॅरिफ लावत असल्याचे जाहीर केले. हे टॅरिफ जाहीर करताना ट्रम्प म्हणाले की, जसे लहान मुलाच्या हातातील कँडी चोरून घेतली जाते, तसेच इतर देशांकडून सिनेमा उद्योग अमेरिकेच्या हातातून चोरून घेण्यात आला. याचा फटका कॅलिफोर्नियाला त्यांच्या कमजोर आणि अक्षम गव्हर्रनरमुळे बसला. 

आता ट्रम्प यांच्या नव्या आदेशानुसार दीर्घकाळ आणि कधीच न सुटणा-या प्रश्नांसाठी अमेरिकेबाहेर बनलेल्या कोणत्याही चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, अमेरिकेला पुन्हा महान बनवू या, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. या आधी ट्रम्प यांनी विदेशात तयार होणा-या औषधांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय औषध कंपन्यांना याची फार मोठी झळ बसणार आहे. यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतानाच आता ट्रम्प यांनी विदेशात तयार होणा-या सिनेमावरही १०० टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.   

अमेरिकेचे अध्यक्षपद दुस-यांदा स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लावले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी ते विविध देशांवर दबाव आणून व्यापार करार करत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी कराराबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप व्यापारी करार अंतिम झालेला नाही.