चेन्नई : आंध्र प्रदेशमधील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपति मंदिर लवकरच एका महत्त्वपूर्ण बदलासाठी सज्ज झाले आहे. मंदिरात लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाने युक्त असलेले कमांड कंट्रोल सेंटर सुरू केले जाणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मंदिरातील भाविकांची गर्दी नियंत्रित करणे अधिक सोपे आणि प्रभावी होईल.
तिरुपति मंदिर हे भारतातील कोणत्याही मंदिरात अशा प्रकारचे एआय-सज्ज कमांड कंट्रोल सेंटर सुरू करणारे पहिले मंदिर ठरणार आहे. याच कारणामुळे या मंदिराला भारताचे पहिले एआय टेंपल असे म्हटले जात आहे. हे नवीन तंत्रज्ञान आणि अक वापरून मंदिरात येणा-या भाविकांच्या गर्दीचे आकलन केले जाईल. दर्शनासाठी रांगेत किती भक्त आहेत, याचा अंदाज घेता येईल.