फ्रांसमध्ये पुन्हा लोकोर्नूच पंतप्रधान

yongistan
By - YNG ONLINE
आठवड्यात दुस-यांदा पंतप्रधान
पॅरिस : वृत्तसंस्था
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. एका आठवड्यापूर्वी राजीनामा देणारे सेबॅस्टिन लोकोर्नू यांनी पुन्हा फ्रान्सच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. प्रचंड राजकीय गोंधळ आणि अराजकतेच्या काळात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लेकोर्नू यांची पुन्हा नियुक्ती केली. यामुळे देशातील राजकीय अस्थिरता आणि सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

लोकोर्नू यांनी एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन त्यांच्या जागी दुस-याची नियुक्ती करणार होते, परंतु अचानक मॅक्रॉन यांनी लोकोर्नू यांच्याच नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे लोकोर्नू यांच्या सेंटर-लेफ्ट गटाला राष्ट्रीय असेंब्लीमध्ये बहुमत नाही. तसेच त्यांना स्वत:च्या पक्षातून तीव्र टीकेचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात फ्रान्समधील मॅक्रॉन यांचे सरकार वारंवार कोसळत आहे. मॅक्रॉन यांनी वर्षभरात चार पंतप्रधान बदलले आहेत. बहुमत नसल्याने आणि वाढत्या जनआक्रोशामुळे त्यांचे पंतप्रधानपद किती काळ टिकेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.