बिहारचे नेते नितीन नबीन भाजपचे कार्यकारी अध्यक्ष

yongistan
By - YNG ONLINE



भाजपकडून घोषणा, नबीन बिहार सरकारमधील मंत्री 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

भाजपने नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी घोषणा केली. बिहार सरकारचे मंत्री नितीन नबीन यांची पक्षाचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर आता नितीन नवीन हे पक्षाच्या जबाबदा-या स्वीकारतील. याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

भाजपच्या संसदीय मंडळाने बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे आता भाजपला नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. भाजप अध्यक्ष हे संविधानिक किंवा सरकारी पद नाही. त्यामुळे त्यांना सरकारकडून कोणतेही वेतन दिले जात नाही. त्याऐवजी पक्ष स्वत: आपल्या निधीतून पगार आणि इतर सुविधा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.