पॅरिस ऑलिंपिकमध्ये अमेरिका अव्वल

yongistan
By - YNG ONLINE
सलग चौथ्यांदा आघाडी, ३२ प्रकारांतील ३२९ पदकांची लयलूट

पॅरिस : वृत्तसंस्था 
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेची रविवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सांगता झाली. या स्पर्धेत १० हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ३२ वेगवेगळ््या क्रीडा प्रकारात एकूण ३२९ पदके देण्यात आली. यामध्ये अमेरिकेने सलग चौथ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. अव्वल स्थानासाठी अमेरिका आणि चीनमध्ये चुरस होती. परंतु अखेर अमेरिकेने बाजी मारली. 
अखेरची स्पर्धा रविवारी झाल्यानंतर पदक तालिकेतील सर्व क्रमांकावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये अमेरिकेने चीनला मागे टाकात अव्वल स्थान पटकावले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शेवटी महिलांची बास्केटबॉलची अंतिम फेरी पार पडली. अटीतटीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेने फ्रान्सला ६७-६६ अशा फरकाने पराभूत केले. यामुळे अमेरिकेच्या महिला संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यामुळे स्पर्धेच्या शेवटी अमेरिकेचेही ४० सुवर्णपदक झाले. चीननेही ४० सुवर्णपदके जिंकली. मात्र, अमेरिकेने चीनपेक्षा अधिक रौप्य पदके जिंकली. त्यामुळे अमेरिकेला अव्वल स्थान प्राप्त झाले. 
जर अमेरिकेचा महिला बास्केटबॉल संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला असता तर सर्वाधिक सुवर्णपदके जिंकल्याने चीनने अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, अमेरिकेच्या बास्केटबॉल संघाने सुवर्णपदक जिंकत अमेरिकेचे अव्वल स्थान कायम राखले. 
भारत ७१ व्या क्रमांकावर
या स्पर्धेत भारत १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांसह ७१ व्या क्रमांकावर राहिला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने जिंकलेल्या एका सुवर्ण पदकामुळे पाकिस्तानने भारताला पदक तालिकेत मागे टाकत ६२ वा क्रमांक मिळविला.

१) अमेरिकेची पदकसंख्या
सुवर्ण : ४०
रौप्य : ४४
कांस्य ४२
एकूण : १२६

२) चीनची पदकसंख्या
सुवर्ण : ४०
रौप्य : २७
कांस्य २४
३) जपानची पदकसंख्या
सुवर्ण : २०
रौप्य : १२
कांस्य : १३
४) ऑस्ट्रेलियाची पदकसंख्या
सुवर्ण : १८
रौप्य : १९
कांस्य : १६
५) यजमान फ्रान्स
सुवर्ण : १६
रौप्य : २६
कांस्य : २२