वडिलांच्या आधी आईचे नाव बंधनकारक

yongistan
By - YNG ONLINE
मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : प्रतिनिधी 
शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय सोमवार, दि. ११ मार्च २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 
१ मे, २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा. तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म/मृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पध्दतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी, तसेच स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आली