आशा पारेख यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार

yongistan
By - YNG ONLINE
शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार 

मुंबई : प्रतिनिधी 
राज्य सरकारच्या  सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ चा स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे तसेच स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन. चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार, १४ ऑगस्ट २०२४ रोजी या पुरस्कारांची घोषणा केली. येत्या  २१ ऑगस्ट रोजी एका विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप  १० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे असून  स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप  सहा  लाख रुपये , मानपत्र आणि  मानचिन्ह असे आहे.  चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप  १० लाख रुपये, मानपत्र आणि  मानचिन्ह असे आहे.तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ६ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे आहे.